काबुल – हल्ल्यांच्या धमकी, निवडणुकीविरोधातील निःशब्द मोहीम आणि गैरव्यवहारांचा परिणाम म्हणून रविवारी झालेल्या अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय निवडणुकीत मतदारांचा सहभाग मागील वर्षांच्या तुलनेत कमी होता. शनिवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात मतदान झाले. अंदाजे 35 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील सुमारे 9.6 दशलक्ष नागरिकांनी या निवडणुकीत मतदानासाठी नोंदणी केली होती, ही निवडणूक जवळपास 4,900 मतदान केंद्रांवर पार पडली.
मात्र अर्ध्याहून अधिक स्थानकांवरील माहितीवरून केवळ 1.1 दशलक्षाहून कमी लोकांनी मतदान केले असल्याचे निष्पन्न झाले. अफगाणिस्तानच्या निवडणूक आयोगाने रविवारी पहाटे जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालात ही बाब दिसून आली आहे. जर मतदानाचा कमी असलेला कल कायम राहिला तर त्या भागाचे प्रतिनिधित्व अफगाणिस्तानच्या मागील तीन अध्यक्षपदाच्या निवडणुकींपेक्षाही कमी म्हणजे 25 टक्क्यांपेक्षा कमी ठरेल.
2014 मध्ये मतदान 50 टक्क्यांपेक्षा कमी झाले होते, मागील निवडणुका गैरव्यवहाराच्या आरोपामुळे डागळल्या गेल्या होत्या. तालिबानचे मोठ्या प्रमाणातले हल्ले रोखले गेले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यामुळे शनिवारी झालेल्या निवडणूकीला अधिकाऱ्यांनी यश मानले.
तालिबानने 531 हल्ले केले. तर गृह मंत्रालयाने 68 हल्ले झाल्याचे म्हटले आहे. परंतु मतदान प्रक्रियेबाबत संशयामुळे मतदानालाही खीळ बसली. 19 ऑक्टोबर पर्यंत निकाल अपेक्षित नाहीत. उमेदवारांना पूर्णपणे विजयी घोषित करण्यासाठी 50 टक्क्यांहून अधिक मतांची गरज आहे, अन्यथा पहिले दोन उमेदवारांमध्ये दुसऱ्या फेरीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल.