पुणे – प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे.
रेल्वेकडून उत्सव विशेष गाड्यांचे सुरू असून, प्रवाशांची संख्यादेखील वाढत आहे. प्रवासी गाड्या नियमित सुरू नसल्याने रेल्वेकडून उत्सव आणि विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे.
गांधीधाम-बेंगलुरु एक्स्प्रेस, बेंगलुरु-जोधपूर एक्स्प्रेस, मैसुरु-अजमेर एक्स्प्रेस, अजमेर-मैसुरु एक्स्प्रेस, यशवंतपूर-जयपूर सुविधा विशेष एक्स्प्रेस, जयपूर- यशवंतपूर सुविधा विशेष, बेंगलुरु-अजमेर एक्स्प्रेस, अजमेर-बेंगलुरु एक्स्प्रेस, बेंगलुरु-जोधपूर एक्स्प्रेस, जोधपूर-बेंगलुरु एक्स्प्रेस, बेंगलुरु-मिरज एक्स्प्रेस या गाड्यांना जून अखेरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.
तर जोधपूर- बेंगलुरु एक्स्प्रेस, अजमेर-मैसुरु एक्स्प्रेस, हुबळी-दादर एक्स्प्रेस, मिरज-बेंगलुरु एक्स्प्रेस या गाड्या जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
वास्को-हजरत निजामुद्दीन- वास्को गाडी रद्द
वास्को-हजरत निजामुद्दीन- वास्को दरम्यानची गाडी दोन दिवस रद्द होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. रेल्वेकडून विविध मार्गांवर क्लोन ट्रेन सोडण्यात येत आहेत. 26 मार्च रोजी सुटणारी वास्को- हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस आणि 28 मार्च रोजी हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस रद्द केली आहे. या कालावधीत प्रवास करणाऱ्या नागरिकांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.