व्यापाऱ्याला “गुगल पे’ पडले महागात

सर्व्हर खराब असल्याचे सांगून भामट्याने केली फसवणूक

पुणे : मुलाच्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ पाहिजे, असे सांगून फर्गसन रस्त्यावरील व्यावसायिकाला “गुगल पे’द्वारे 15 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 16) दुपारी घडला.

याप्रकरणी केतन कृष्णा बावळेकर यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक कुमार या भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक केतन बावळेकर यांचे फर्गसन रस्त्यावर “कृष्णा फ्लोरिस्ट’ नावाचे फुलांचे दुकान आहे. आज दुपारी एकच्या सुमारास त्यांना अशोक कुमार नावाच्या व्यक्‍तीचा फोन आला.

“माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे मला 40 बुके (पुष्पगुच्छ) पाहिजेत. त्यावर 16 हजार रुपये होतील, असे व्यावसायिकाने सांगितले. भामट्याने ठीक आहे, असे म्हणत आज काही रक्‍कम ऍडव्हान्स देतो आणि उद्या माझा माणूस पुष्पगुच्छ घेण्यास येईल त्यावेळी राहिलेले पैसे देईल, असे सांगितले.

त्यानंतर “तुमच्याकडे गुगल पे आहे का? असेल तर त्यावरच ऍडव्हान्स पैसे पाठवितो. व्यावसायिकानेही नुकतेच “गुगल पे’ खाते सुरू केल्यामुळे होकार देत याच नंबरवर ऍडव्हान्स पाठवा, असे सांगितले.

मात्र, थोड्यावेळाने पुन्हा व्यावसायिकाला फोन करून तुमचा नंबर “गुगल पे’वर दिसत नाही. तुमच्या मोबाइलवरून मला 5 रुपये पाठवा, मी तुम्हाला परत पाठवितो. त्यानुसार व्यावसायिकाने 5 रुपये पाठविले आणि भामट्यानेही त्यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी 5 रुपये पुन्हा व्यावसायिकाला पाठविले.

मात्र, त्यानंतर नेटवर्क निट नाही आणि माझे खाते मर्चंट असल्यामुळे पैसे येण्यास उशीर होत आहे, असे सांगून “तुम्ही मला 10 हजार रुपये पाठवा, मला येतात का ते पाहतो’ असे म्हणून भामट्याने व्यावसायिकाकडून 15 हजार रुपये उकळले.

अर्धा तास झाला तरीही पैसे आले नाही म्हणून व्यावसायिकाने भामट्याला फोन केला असता, त्याने फोन बंद करून ठेवला आणि आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here