पुणे -फर्गसन महाविद्यालयाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात शुल्क वाढ केल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र, अशी कोणतीही शुल्कवाढ केली नसल्याचे फर्गसन महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, “फर्गसन महाविद्यालयाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात कला आणि विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी कोणतीही शुल्कवाढ केलेली नाही.
2019-2020 या शैक्षणिक वर्षात पदवीच्या पहिल्या वर्षासाठी जे शुल्क आकारण्यात आले होते, तेच शुल्क पदवीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठी आकारण्यात येत आहे.