पुणे : आवकच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे मेथी, शेपू, कांदापात आणि चुकाच्या भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या भावात जुडीमागे ५ रुपये, शेपू ३ रुपये, कांदापात २ रुपये आणि चुकाच्या भावात १ रुपयांनी वाढ झाली आहे, तर आवक वाढूनही मागणी कमी असल्यामुळे कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे ५ रुपये आणि करडईच्या भावात १ रुपयांनी घट झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. ८) कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी आवक झाली. ही आवक मागील आठवड्याच्या तुलनेत कमी असून, मागील आठवड्यात दीड लाख जुडी आवक झाली. मेथीची ६० ते ७० हजार जुडींची आवक झाली होती. ही आवकही मागील आठवड्याच्या तुलनेत कमी आहे. मागील आठवड्यात ८० ते ९० हजार जुडीची आवक झाली होती.