जाणून घ्या फेंगशुईमधील रंगांचे महत्त्व

विशिष्ट रंगांच्या वापराने सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते

फेंगशुई केवळ विशिष्ट वस्तूच्या वापराने किंवा घरात काही बदल करण्यानेच अंगीकारता येते असं नाही. तर रंग हेही फेंगशुईत महत्त्वाचे असतात. विशिष्ट रंगांच्या वापराने आपल्या आयुष्यात उत्साहाचे, आनंदाचे रंग भरले जातात. सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. या रंगाच्या वस्तू घर किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाहू लागते.

फेंगशुई रंग वापरताना ते एकत्रितपणे वापरावेत. काळा आणि मेटॅलिक रंग एकत्र वापरल्यास करिअर झेप घेऊ शकते. पांढरा रंग सोनेरी आणि रुपेरी रंगांबरोबर वापरल्यास आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण होते. हे कॉम्बिनेशन घरातील सगळे लोक जमतात अशा खोलीत वापरावं म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लॅव्हेंडर रंगही असे वातावरण निर्माण करण्यास मदत करतो. मात्र हे कुठलेही रंग वापरताना गरजेपेक्षा अधिक वापरू नका. अन्यथा त्याचा तुम्हालाच त्रास होईल.

यीन आणि यांग अशा दोन रंगांमध्ये फेंगशुई रंग विभागले गेले आहेत. यीन रंग हे सुखावणारे आणि मनाला उभारी देणारे असतात. असे रंग शयनगृहात आणि नर्सरीमध्ये दिले पाहिजेत.

यीन रंग निळा
या रंगाची सांगड फेंगशुईत बुद्धिमत्ता आणि शोधक वृत्तीशी घातली आहे. तो आपल्याला सुखावतो आणि डोळ्यांना विश्रांती देणारा रंग आहे. आपण समुद्राचे चित्र पाहतो म्हणजे काय तर त्यातील शांत पाणी त्याचा अफाटपणा भावतो. या चित्रामुळे आपल्याला एक शांत अनुभव येतो.

काळा
हा रंग करिअरसाठी सर्वोत्तम मानला जातो. मेटॅलिक रंगाबरोबर तो वापरला तरी तो उत्तम ठरतो. हा रंग सत्ता आणि भावनिक संरक्षणाचं प्रतीक मानलं जातं. आजारातून बरं करण्यासाठीही काळा रंग वापरला जातो.

जांभळा
या रंगाची सांगड तीव्र प्रेरणेशी घातली जाते.

पांढरा
पावित्र्य आणि आत्मविश्वास जागृत करणारा हा रंग आहे.

यांग रंग
या श्रेणीतील रंग काहीसे भडक असतात.  कधी कधी हे रंग यीन श्रेणीतील रंगांना पूरकही असतात.

लाल
भावनात्मक उत्तेजना निर्माण करणारा हा रंग आहे. कधी कधी उत्तेजना प्रमाणाबाहेरचीही असू शकतात. म्हणूनच याचा वापर काळजीपूर्वक केला जातो.

पिवळा
हा रंग लाल रंगाच्या प्रकृतीशी सार्धम्य साधणारा रंग आहे. सूर्यप्रकाशाशी संबंधित असून त्यामुळे उबदारपणा, सौम्यता आणि मित्रत्व निर्माण होते. हा रंग काळजीपूर्वक वापरावा लागतो. कारण अनाठायी काळजी उत्पन्न करू शकतो.

केशरी
एखाद्याकडे संघटनात्मक कौशल्य नसेल तर त्याच्यासाठी केशरी रंग उपयुक्त आहे. ऑफिस किंवा घरात त्याचा वापर करावा. कला आणि साहित्यातील मंडळींसाठी हा रंग विशेष उपयुक्त आहे. सृजनाची ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी केशरी रंग सहाय्यभूत ठरतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.