शेतीच्या वादातून महिलेस मारहाण 

जामखेड  -शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एक महिला जखमी झाली असून, या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात चौघांविरोधात मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, शेतात मोघडणी सुरू असताना, महिला व त्यांची मुलगी तेथे गेले असता, त्या ठिकाणी आरोपी अशोक आजीनाथ डुचे, सदानंद अशोक डुचे, पुष्पा अशोक डुचे, मोहिणी अशोक डुचे (सर्व रा. खुरदैठन) हे तेथे येऊन, तुम्ही येथे मोघडणी करायची नाही. म्हणून शिवीगाळ करून आरोपी नं. एक याने फिर्यादीच्या अंगाशी लगट करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच हातातील काठीने, गजाने फिर्यादीच्या हातावर पायावर मारले. आरोपी नंबर दोन याने हातातील लाकडी काठीने हाताला व डोक्‍यास दुखापत करून जखमी केले.फिर्यादीच्या मुलीस शिवीगाळ केली. आरोपी तीन व चार ने हाताने मारहाण केली. या घटनेत महिला जखमी झाली असून, तीने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्याला मारहाण व विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.