टीक-टॉक व्हिडीओमुळे महिला पोलिसाचे निलंबन

अहमदाबाद – पोलिस स्थानकात टीका- टॉक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर केल्याने गुजरातमधील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे टीक-टॉक व्हिडिओ तयार करणे त्या महिला पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे.

मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज पोलिस स्थानकात कार्यरत असणारी महिला पोलिस अर्पिता चौधरी हिने कामावर असताना टीक- टॉक व्हिडीओ तयार केला. स्थानकात असलेल्या तुरुंगाच्या समोरच ती बॉलिवूड गाण्यावर डान्स करत होती. हा व्हिडीओ 20 जुलै रोजी स्थानकात चित्रीत करण्यात आला होता. त्यानंतर व्हॉट्‌सऍपसह अन्य सोशल मीडिया साईटवर तो व्हायरल झाला होता.

अर्पिता चौधरी हिच्यावर लंघनाज पोलिस स्थानकाकडून निलंबनाची कारवाई केली आहे. चौधरी यांनी नियम पायदळी तुडवले आहेत. कामावर असताना तिने वर्दीही परिधान केली नव्हती. त्याच बरोबर तिने हा व्हिडीओ पोलिस स्थानकात चित्रीत केला. पोलिसांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तिने नियम मोडले म्हणून तिच्यावर कारवाई करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त मंजिता वंझारा यांनी निलंबनाच्या कारवाई नंतर बोलताना सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.