निवडणुकीत पैसे वाटल्या प्रकरणी महिला खासदाराला सहा महिन्यांचा तुरुंगवास; देशातील पहिले प्रकरण

हैदराबाद: सध्याच्या निवडणूक म्हणजे पैशांचा बाजार असल्याचे म्हटले जाते. निवडणुक नेत्यांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप वारंवार होत असताना आपण ऐकतो. पण, पैसे वाटल्याप्रकरणी खासदारला शिक्षा झाल्याचे पहिलेच प्रकरण हैदराबादमध्ये घडले आहे. मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी तेलंगाणातील महबूबाबादच्या आणि तेलंगाणा राष्ट्रीय समितीच्या खासदार मलोत कविता यांना नामपल्लीमधील एका विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

मलोत कविता यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकी दरम्यान पैसे दिल्याच्या प्रकरणता दोषी ठरल्या आहेत.  न्यायालयाने त्यांना दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास  ठोठावला आहे. पण, न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाच्या विरोधात त्यांना उच्च न्यायालयात  अपील करण्यासाठी परवानगीही देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच मलोत कविता  उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना तेव्हा समोर आली, जेव्हा 2019 मध्ये महसुल अधिकाऱ्यांनी मलोत कविता यांचा सहकारी शौकत अलीला पैसे वाटताना रंगेहाथ पकडले होते. शौकत अली बर्गमपहाड परिसरातील मतदारांना एका मतासाठी 500 रुपये देत होते. यानंतर पोलिसांनी आधी शौकत अलीवर आणि त्यानंतर मलोत कविता यांच्यावर मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सुनावणीदरम्यान फ्लाइंग स्क्वाडच्या अधिकारी आणि त्यांच्या रिपोर्टला पुरावा म्हणून सादर केले. चौकशीदरम्यान शौकत अलीने आरोप मान्य करत कविता यांच्या सांगण्यावरुन पैसे वाटल्याचे कबुल केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.