बारामती ; कण्हेरीत मादी जातीचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

बारामती (नवनाथ बोरकर) – बारामती तालुक्यातील कण्हेरी भागात मादी जातीच्या बिबट्याने आठ दिवसापासून धुमाकूळ घातला होता. एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे जंगली बिबट्याने नागरिकांना हैराण करून सोडले होते.

अनेक शेतकऱ्याच्या पाळीव जनावरांनवर या बिबट्याने हल्ला केला आहे. अनेक जणांच्या शेळ्या मेंढ्या ठार केल्या आहेत. यामुळे नागरिक भयभीत झाले होते.अखेर पुणे रेस्क्यू टीम आणि बारामती वनविभागाला आज सकाळी सहा वाजता संतोष जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात यश आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.