नगर – जिल्हा परिषदेच्या नगर शहरासह जिल्ह्यात विविध मोक्याच्या ठिकाणी कोट्यावधी रूपयांच्या स्वमालकीच्या जागा आहेत.मात्र जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक विभाग या जागा परस्पर वितरीत करून टाकतात. हे अत्यंत चुकीचे आहे.जिल्हा परिषदेच्या जागा हडप करण्याचा हा डाव आहे.तो हाणून पाडत या स्वमालकीच्या जागांची माहिती एकत्रित संकलित करण्याची मागणी केली.त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी एकही जागा कुणाकडे जावू दिली जाणार नाही,असे सांगितले.
जिल्हा परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज,दि.13 दुपारी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जागा हस्तातंरणाचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी कैलास वाकचौरे,संदेश कार्ले,रामदास भोर,माधव लामखडे,हर्षदा काकडे,क्षितीज घुले, रामहरी कातोरे यांनी याविषयावर आक्रमक भूमिका घेतल्या. कोट्यावधी नाही तर नगर शहरासारख्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अब्जावधीच्या जागा आहेत. त्या कोणत्याही विभागाकडे जिल्हाधिकारी,महसूल व संबंधीत अधिकारी वर्ग करून घेतात.
यावर जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. आपल्या आधीच्या पिढ्यांनी जपलेली ही मालमत्ता अशीच कुणाच्या घशात घालायची का असा सवाल करत हे सदस्य संतप्त झाले. जिल्हा परिषद शेजारील कोटयावधीची जागा राज्य उत्पादन शुल्कच्या घशात कशी घातली असा सवाल रामदास भोर यांनी केला.केडगावची अडीच एकर मोक्याची जागा ंभूजल विभागाला दूेवून टाकण्यात आली. माधव लामखडे यांनी तीन वर्ष होवूनही अजून या जागांचा एकत्रित अहवाल सादर का केला नाही असा प्रश्न उपस्थित केला.
महानेटने खोदलेले रस्ते होणार दुरुस्त जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सूचना
महानेटच्या कामासाठी नगर तालुक्यातील रस्ते खोदण्यात आलेले आहे. . हा मुद्दा आज (शुक्रवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले. रस्त्यांची झालेली दुरुस्ती करून घेण्याची सूचना सभागृहात करण्यात आली. त्यावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी संबंधित कामाची पहाणी करून तसा अहवाल तयार करून संबंधित यंत्रणेकडून रस्त्यांची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकामच्या दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.