10 रुपयांमध्ये जेवण द्यावं लागण हा चिंतनाचा विषय: मुनगंटीवारांचा टोला

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित केला होता. या जाहीरनाम्यात 10 रुपयांमध्ये जेवण्याच्या थाळीसह विविध आश्वसन देण्यात आली आहे. यातील “१० रुपयांत जेवण” हा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या मुद्यावरूनच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, 10 रुपयांना जेवण देणं वाईट नाही. परंतु 10 रुपयांमध्ये राज्यात जेवण द्यावं लागण हा चिंतण करण्यासारखा विषय आहे. तसेच लोकांची आर्थिक शक्ती वाढवा असं म्हणत शिवसेनेच्या 10 रुपयांच्या जेवणाच्या थाळीवर टोला लगावला आहे
.
दरम्यान युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर दहा रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी बससेवा सुरू केली जाईल, तसेच ३00 युनिटपर्यंतचा वीजदर ३0 टक्के कमी केला जाईल , शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार देणार असल्याचे शिवसेनेनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.