नवी दिल्ली – स्वीसचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर टेनिस कोर्टवर परतण्याची शक्यता फारच कमी झालेली आहे. नुकतेच त्याने आगामी होणाऱ्या यू एस ओपन म्हणजेच अमेरिकन ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे.
फेडरर दुखापतीमुळे त्रस्त आहे. गेल्या बऱ्याच काळापासून गुडघ्याच्या दुखण्यानं त्याला अनेक स्पर्धाना मुकावे लागले आहे. उजव्या गुडघ्यावर करण्यात आलेल्या तिसऱ्या शस्त्रक्रियेमुळं रॉजर यूएस ओपनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.
एवढंच नाहीतर आता रॉजर फेडररच्या टेनिस कोर्टवर परतण्याची अपेक्षा फारच कमी आहे. यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररच्या वापसीकडे डोळे लावून बसलेल्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे.
यापूर्वी वीस वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडररनं काही दिवसांपूर्वीच आपल्या वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. फेडररला विम्बल्डन 2021 च्या क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
View this post on Instagram
रॉजर फेडररनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ मेसेज शेअर केला आहे. याच व्हिडीओतून रॉजर फेडररनं यूएस ओपनमधून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे, “मी अनेक डॉक्टरांकडून सल्ला घेतला.
ग्रासकोर्ट सत्र आणि विम्बल्डन दरम्यान माझ्या गुडघ्याचं दुखणं आणखी वाढलं. त्यांनी मला आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं सांगितलं.
मी सुद्धा त्यांचा सल्ला मानण्याचं ठरवलं. त्यामुळे मला काही महिने टेनिस कोर्टपासून दूर राहावं लागेल.” . रॉजर आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाला आहे .