February Travel Destinations: फेब्रुवारी हा असा महिना आहे, जेव्हा थंडी हळूहळू कमी होते, उकाडा अजून जाणवत नाही आणि प्रवासासाठी हवामान अगदी परफेक्ट असतं. ना अंग गोठवणारी थंडी, ना थकवणारी गरमी. डोंगर स्पष्ट दिसतात, समुद्र शांत असतो आणि मैदानी भागात वसंताची चाहूल लागते. वर्षातून एकच ट्रिप प्लॅन करायची असेल, तर फेब्रुवारी (February) हा सर्वात चांगला महिना ठरतो. फेब्रुवारीत फिरण्याचे फायदे हॉटेल आणि फ्लाइटचे दर तुलनेने संतुलित गर्दी कमी, अनुभव अधिक फोटोग्राफीसाठी स्वच्छ आकाश कपड्यांची पॅकिंग सोपी चला तर जाणून घेऊया, फेब्रुवारी महिन्यात भारतात फिरण्यासाठी कोणती ठिकाणं सर्वोत्तम ठरतात. जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर (Jaipur)फेब्रुवारीत बसंती रंगात न्हालेली दिसते. दिवसा सौम्य ऊब आणि रात्री हलकी गारवा असं इथलं हवामान फिरण्यासाठी अगदी योग्य असतं. इतिहास, संस्कृती आणि शाही थाट यांचा सुंदर संगम म्हणजे जयपूर. काय पाहाल? आमेर किल्ला, हवा महल, सिटी पॅलेस स्थानिक बाजार आणि राजस्थानी खाद्यसंस्कृती जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल Jaipur ऋषिकेश उत्तराखंडमधील ऋषिकेश ही शांती आणि साहस दोन्ही अनुभव देणारी जागा आहे. फेब्रुवारीत इथे ना फार थंडी असते, ना गर्दी. मनाला शांतता हवी आणि थोडा रोमांचही हवा, अशांसाठी हे ठिकाण उत्तम. काय कराल? गंगेची आरती आणि आध्यात्मिक अनुभव योग, ध्यान आणि कॅफे कल्चर रिव्हर राफ्टिंग Rishikesh गोवा नववर्षाची गर्दी ओसरल्यानंतर फेब्रुवारीत गोवा अधिक निवांत वाटतो. हवामान अजूनही सुंदर असतं, गोंधळ कमी झालेला असतो. पार्टीपेक्षा निसर्गाचा आणि शांततेचा आनंद घेता येतो. काय अनुभवता येईल? स्वच्छ समुद्र आणि सोनेरी वाळू नॉर्थ गोव्यात नाइटलाइफ, साऊथ गोव्यात शांतता सीफूड आणि सुर्यास्त Goa कच्छचा रण गुजरातमधील कच्छचा रण म्हणजे पांढऱ्या मिठाचा वाळवंट आणि समृद्ध लोकसंस्कृती. फेब्रुवारी हा रण उत्सव पाहण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. ही यात्रा केवळ पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची असते. काय पाहाल? पांढऱ्या मिठाचं रण लोकनृत्य, कच्छी हस्तकला चांदण्याच्या रात्री रणाचं जादूई सौंदर्य Rann of Kutch वाराणसी उत्तर प्रदेशातील वाराणसी हे शहर आध्यात्मिकतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. फेब्रुवारीत इथलं हवामान अतिशय आल्हाददायक असतं. काशीचा अनुभव माणसाला आतून बदलून टाकतो. Varanasi काय कराल? गंगा घाटांवर सकाळची नौकाविहार काशी विश्वनाथ मंदिर दर्शन बनारसी पदार्थ आणि अरुंद गल्लीबोळ