नवी दिल्ली : दिल्लीतील पटियाला हाऊस कार्टने निर्भया प्रकरणातील चारही आरोपीचे डेट वारंट जरी केले आहे. या चारही दोषींना 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी देण्यात येईल.
दरम्यान बलात्कार पीडितेच्या आई आशा देवी यांनी माझ्या मुलीला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. चार दोषींना फाशी देण्यात आल्यामुळे या देशातील महिला सशक्त होतील. या निर्णयामुळे न्यायालयीन यंत्रणेवरील लोकांचा विश्वास बळकट होईल अशा त्या म्हणाल्या.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: My daughter has got justice. Execution of the 4 convicts will empower the women of the country. This decision will strengthen the trust of people in the judicial system. pic.twitter.com/oz1V5ql8Im
— ANI (@ANI) January 7, 2020
पटियाला हाऊस कोर्टाबाहेर निर्भयाची आई अत्यंत भावनिक झाल्या होत्या. आरोपीना दोषी ठरवताना न्यायाधीश म्हणाले, “आम्हाला तुमच्या विषयी सहानुभूती आहे. दिल्लीत 16 डिसेंबरच्या रात्री, एका अल्पवयीन मुलासह सहा जणांनी 23 वर्षीय निर्भयावर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळी होती.
निर्भया प्रकरणाबद्दल जाणून घ्या
16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भया (नाव बदलले) याच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेत निर्भयाचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी देशभरात तीव्र निदर्शने झाली होती. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 11 मार्च 2013 रोजी राम सिंह नावाच्या मुख्य आरोपीने सकाळी तिहार कारागृहात आत्महत्या केली.
दुसरा आरोपी अल्पवयीन होता. त्याला कारवाईनंतर सुधारगृहात पाठविण्यात आले. याखेरीज अन्य चार आरोपी अक्षय कुमार सिंग, विनय शर्मा, मुकेश आणि पवन गुप्ता हे तिहार तुरुंगात बंद आहेत. या चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.