दुबई – आयपीएल स्पर्धेतील स्थगित झालेल्या सामन्यांना लवकरच येथे सुरुवात होत आहे. त्यासाठी विविध संघ येथे दाखल झाले असून त्यातील ज्या संघांनी विलगीकरण कालावधी पूर्ण केला आहे त्यांचा सरावही सुरू झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या सरावालाही प्रारंभ झाला असून त्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सरावातील फटकेबजी पाहून अन्य संघांना धास्ती वाटली असेल. चेन्नई संघातील खेळाडूंनी विलगीकरण कालावधी पूर्ण केल्यावर त्यांना सरावाची परवानगी देण्यात आली.
यावेळी धोनीसह संपूर्ण संघाने कसून सराव केला. त्यातही धोनीने आपल्या फलंदाजीने उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.
गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत धोनी फारसा यशस्वी ठरला नव्हता. त्यामुळे आता या मोसमात तो कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.