वंचित आघाडीमुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भिती- रामदास आठवले

मुस्लिमांवर दबाव टाकून मंदिर बांधता येणार नाही; पवारांनी एनडीए मध्ये येण्याचा निर्णय घ्यावा

कोल्हापूर: उद्धव ठाकरे 10 वेळा अयोध्येत गेले तर मंदिर होणार नाही म्हणणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अयोध्येच्या जागेवर बुद्ध मंदिराचा दावा केलाय .ही जागा बुद्ध भूमी  असून तिथे बुद्ध मंदिर उभारले जावे अशी मागणी त्यांनी केलीय. त्यासाठी 15 एकर जागेवर त्यांनी दावा केलाय. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आलेले आहेत त्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि शासनाच्या योजनांबाबत चा आढावा त्यांनी घेतला यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध  विषयांवर सविस्तर चर्चा केली यावेळी उद्धव ठाकरे 10 वेळा अयोध्येत गेले तर मंदिर होणार नाही म्हणणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अयोध्येच्या जागेवर बुद्ध मंदिराचा दावा केलाय .ही जागा बुद्ध भूमी  असून तिथे बुद्ध मंदिर उभारले जावे अशी मागणी त्यांनी केलीय. त्यासाठी 15 एकर जागेवर त्यांनी दावा केलाय. मुस्लिमांवर दबाव टाकून मंदिर बांधता येणार नाही असेही हिंदूतवाद्यांचा त्यांनी ठणकावून सांगितलंय

यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेणाऱ्या शरद पवारांवरही त्यांनी निशाणा साधला तर पवारांनी एनडीए मध्ये येण्याचा निर्णय घ्यावा असे सल्लाही त्यानी राष्ट्रवादीच्या  वर्धापन दिनानिमित्त दिलाय. तर ईव्हीएम मशीन वर शंका घेत असाल तर बारामती मध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्ती याच नियम मशीन मध्ये मतदान झाल्यामुळे निवडून आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं

वंचित आघाडीमुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहण्याची भितीही आठवले यांनी व्यक्त केलीय. लोक कॉँग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात दोन्ही कॉँग्रेसना भवितव्य नसल्याने शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर ईव्हीएम मशीनबाबत शंका घेत असल्याबाबत विचारणा केली असता आठवले म्हणाले, ही मशीन्सवरची मतदान पद्धत कॉँग्रेसनेच सुरू केली. एखाद-दुसरे मशीन बाद झाले याचा अर्थ सर्व यंत्रणा चुकीची आहे असे नाही. त्यातूनही काहींना शंका असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी.

वंचित आघाडी ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी असल्याचा आरोप करून आठवले म्हणाले, काही ठिकाणी उमेदवाराचीच ताकद जास्त असल्याने त्यांनी मते खाल्ली. त्यामध्ये वंचितच्या प्रभावाचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी आता एनडीएसोबत यावे. मात्र आम्हांला ओवेसी चालणार नाही. विधानसभेला १८ पैकी १० जागा आरपीआय आठवले गटाला मिळाव्यात, विस्तारावेळी मंत्रिपद मिळावे, ५० कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये स्थान मिळावे, या आपल्या मागण्या आहेत असंही ते म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.