कर्ज बुडण्याची भीती

यंदा पहिल्या तिमाहीत कर्जाच्या प्रोव्हिजनमध्ये वाढ झाली आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे आय.एल.अँड एफ.एस तसेच जेट एअरवेजला दिलेले कर्ज. परिणामी बॅंकेच्या नॉन परफॉर्मिंग असेटसमध्ये (एनपीए) वाढ झाली आहे.

सध्या अर्थव्यवस्थेत मंदी वाढत चालली आहे. मागणी कमी होण्याबरोबरच पावसाबाबतही अनिश्‍चितता दिसून येत आहे. ही स्थिती पाहता लहान उद्योग, रिअल इस्टेट, कृषी, ऊर्जा क्षेत्र एवढेच नाही तर एनबीएफसीला दिलेले कर्ज देखील एनपीएमध्ये जावू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मार्च 2019 मध्ये फॅक्‍ट्री आऊटपूटमध्ये देखील घसरण झाली आहे. त्याचबरोबर 2019 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल देखील चांगले लागलेले नाही. एकंदरीत कंपन्यांची कमाई चांगली झाली नाही तर ते कर्जाची परतफेड कशी करतील हा प्रश्‍न आहे. बहुतांश बॅंका रेपो रेटमधील कपातीचा लाभ पुढे नेण्यास उदासिन दिसून येत असल्याने लहान कंपन्यांना व्याजदरापासून कोणताही लाभ मिळालेला नाही. अनेक कंपन्यांच्या व्याजावरील खर्च 28 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. ही टक्केवारी गेल्या तिमाहीच्या तुलनेत अधिक आहे.

– कीर्ती कदम

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.