जुन्नर -जुन्नर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी एकाच दिवसात करोनाबाधितांनी शतक गाठले. गेल्या 24 तासांत 32 गावांमध्ये एकूण 102 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर केवाडी आणि गुंजाळवाडी आर्वीतील दोन ज्येष्ठ नागरिक दगावले आहेत.
सर्वाधिक 16 रुग्ण नारायणगावात, त्याखालोखाल राजुरीत 10, जुन्नर नगरपालिका हद्दीत 8, आळे, वडगाव आनंद, ओतूर व बेल्ह्यात प्रत्येकी 6, पारगाव तर्फे आळेमध्ये 4, निमगाव सावा, कुमशेत, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी, कुरण, शिरोली बुद्रुक, गुंजाळवाडी आर्वी येथे प्रत्येकी 2, तर तांबे, मंगरुळ, शिरोलीतर्फे आळे, वारुळवाडी, धनगरवाडी, आर्वी, डिंगोरे, कांदळी, वडगाव कांदळी, बोरी बुद्रुक, खानापूर, जळवंडी, धोलवड, वडगाव सहाणी आणि उदापूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 7396 झाली असून, 6608 उपचारानंतर बरे झाले आहेत. 272 जणांचा या आजाराने बळी घेतला असून, 516 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.