येवलेवर एफडीए कावले

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून देण्यात आले आहेत. तसेच सहा लाख रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश एफडीएचे सहआयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले आहेत.

एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी करत. चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला आहे. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. चहा पावडर बनवण्यासाठी मेलानाईटचा वापर केला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. तपासनीस पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्या येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

येवले कडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातीतील येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नाही, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते हे दवे खोटे असल्याचे एफडीए ने म्हटले आहे. पॅकबंद केलेली चहा पावडर, साखर आणि चहा मसाल्याच्या पाकिटावर कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे त्यात नक्की कोणता अन्नपदार्थ किती प्रमाणत आहे, हे समजू शकत नाही. असेही एफडीए कडून सांगण्यात आले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.