एफसी गोवा क्लबचा महिलांचादेखील संघ

मार्गोवा : दुसऱ्या वेदांता गोवा वूमेन्स फुटबॉल लीगच्या उंबरठ्यावर इंडियन सुपर लीगमधील संघ एफ सी गोवा यांनी त्यांच्या महिला संघाची घोषणा केली. एफसी पुणे सिटीनंतर महिलांचा देखील संघ असणारा एफसी गोवा हा इंडियन सुपर लीगमधील केवळ दुसरा संघ बनला आहे.

वेदांता गोवा वूमेन्स लीग १४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे आणि त्यात आठ संघ सहभागी होतील. गोवा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबादारी नरेश विर्नोडकर यांच्याकडे असेल. हा संघ चौघुले स्पोर्ट्स सेंटर मार्गोवा येथे सर्व करीत आहे.
“महिलांचा संघ देखील त्याच कसोट्यांवर उभारला गेला आहे ज्या कसोट्यांवर पुरुष्यांच्या संघ. हा क्लब प्रतिभावान महिला खेळाडू निर्माण करण्यावर आणि घडवण्यावर खूप मेहनत घेत आहे ज्या पुढे जाऊन १९७० मधील गोवा संघाचे अनुकरण करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवतील.”असे एफसी गोवा संघाच्या तांत्रिक समितीचे मुख्य डॅरिक पेरेरा यांनी सांगितले.
एफसी गोवा हे त्यांच्या सहसंघटन फोर्सा गोवा फाऊंडेशन सोबत मिळून खेळाला जास्तीतजास्त महिला आणि पुरुषांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्य करत आहे. या दोन्ही संघटनांनी मिळून मागील मोसमात १२ वर्षाखालील मुलींची स्पर्धा घेतली होती त्यात १९ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्याच बरोबर या स्पर्धेच्या विजेत्या संघाला एफसी गोवाचे सहसंघमालक विराट कोहली यांच्या कडून सन्मानित करण्यात आले होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)