पत्रकार-लेखिका फातिमा झकारिया यांचे करोनाने निधन

औरंगाबाद – प्रख्यात पत्रकार-लेखिका, पद्मश्री विजेत्या फातिमा आर. झकारिया यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. फातिमा यांचा कोरोना अहवाल काही दिवसांपूर्वीच पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारांना यश आले नाही. कोरोनाच्या सर्व नियम व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून बुधवारी 7 एप्रिल रोजी मौलाना आझाद कॅम्पस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या दिवंगत विचारवंत डॉ. रफिक झकेरिया यांच्या पत्नी होत्या.

फातिमा जकारिया प्रसिद्ध ताज हॉटेल मॅगझिन “ताज’ च्या संपादक होत्या. औरंगाबाद येथील एआयएमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून फातिमा औरंगाबादमध्ये प्रतिष्ठित ‘मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्ट’ (एमएईटी) म्हणून कार्यरत होत्या. एमएईटीची स्थापना कॉंग्रेस नेते दिवंगत डॉ. रफिक जकारिया यांनी 1963 मध्ये केली होती. फातिमा जकारिया यांनी आपल्या दिवंगत पतीच्या वारसा पुढे चालू ठेवला आणि या शैक्षणिक संस्था विकसित केल्या.

याशिवाय फातिमा जकारिया यापूर्वी संडे टाइम्स (मुंबई) आणि बॉम्बे टाईम्सच्या संपादक म्हणूनही काम करत होत्या. वर्ष 1983 मध्ये, फातिमा जकारिया यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्यासाठी सरोजिनी नायडू पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

साहित्य व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 2006 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.