दंगल गर्ल फातिमा सना शेख आता तमिळमधील गाजलेल्या “आरुवी’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. 2017 मध्ये रिलीज झालेल्या “आरुवी’मध्ये आदिती बालनने लीड रोल केला होता. आता या पुढारलेल्या आणि सामाजिक भान तरुणीचा रोल करण्याची संधी फातिमा सना शेखला मिळाली आहे.
तिचे यापूर्वीचे सिनेमे मल्टी स्टार होते. तिच्या “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’मध्ये तर कलाकारांची खूपच गर्दी होती. मात्र, आता प्रथमच तिचा लीड रोल असणार आहे.
केवळ स्वतःला जास्त महत्त्व मिळणार आहे म्हणून आपण हा सिनेमा स्वीकारलेला नाही, तर वेगळ्या आणि सामाजिक आशयाशी संबंधित असल्यानेच आपण होकार दिला आहे.
असे फारच कमी रोल असतात ते आपणच करायला हवे असे वाटते. त्यापैकीच हा एक रोल असल्याचे तिने सांगितले. “आरुवी’ हा जरी तमिळ सिनेमा असला तरी त्याचा रिमेक अगदी नव्या सारखा असणार आहे, असेही ती म्हणाली.