म्हैसूर – डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात अशा अनेक ओळी आपण आजवर वाचल्या आहे. मुलांसाठी प्रत्येक आई वडील आपल्या जीवाचं राण करतात. आणि यात जेव्हा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असतो तेव्हा ते स्वःताच्या जीवाची बाजी देखील लावतात. अशीच एक घटना कर्नाटकमधील म्हैसूर याठिकाणी घडली आहे.
Karnataka: A 45-year-old Anand, a resident of Koppalu village in Mysore cycles 300 km to Bengaluru to bring his son’s medicine
“I asked for my son’s medicines here but couldn’t find it. He can’t skip medicines even for a day. I went to Bengaluru & it took me 3 days,” says Anand pic.twitter.com/nnAUBIBqna
— ANI (@ANI) June 1, 2021
कर्नाटकमधील म्हैसूर येथील कोप्पालू गावात राहणाऱ्या आनंद नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलाला औषध आणण्यासाठी तब्बल 300 किलोमीटरचा सायकल वरून प्रवास केला आहे. त्याने या बाबत वृत्तमाध्यमांशी बोलतांना सांगितले,’माझ्या दहा वर्षाच्या मुलगा असून त्याला मानसिक आजार आहे. मला डॉक्टरांनी सांगितले होते की जर हा एक डोस चुकला तर त्याला पुन्हा 18 वर्षे हा डोस द्यावा.
आणि ही औषध गावात मिळत नसून ती फक्त NIMHANS मध्येच उपलब्ध होते. त्यामुळे या साठी मी माझ्याबरोबर नातेवाईकांना कार, दुचाकी, किंवा ऑटोने येण्यास मदत मागितली असता लॉक डाउनमुळे कोणीही मदत केली नाही शेवटी अखेरचा पर्याय निवडत मी थेट सायकलने 300 किलोमीटरचा प्रवास करून मुलासाठी औषध आणलं.’
दरम्यान. या घटने बाबत डॉक्टरांनी सांगितले की, ‘त्यांचा मुलगा एकही डोस मिस करू शकत नाही. पण ते औषध म्हैसूरमध्ये उपलब्धच नसल्याने सायकलने त्यांना बंगळुरू गाठावं लागलं.’