धक्कादायक! वडिलांनीच केला पोटच्या मुलांचा खून 

शिरवळ – वडिलांनीच पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. .

माहितीनुसार, मुंबई येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील हे तिघे आपल्या मूळ पाटण तालुक्यातील गावी येण्यासाठी निघाले होते. शिरवळजवळ वडिलांनी या बहिण-भावाचा गळा आवळला. दरम्यान, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. आजारपणाने त्रस्त असल्यामुळे आपल्याऩंतर मुलांचे कसे होणार, या चिंतेतून वडिलांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here