पित्या समान व्यक्तीला गमावले-गंभीर

नवी दिल्ली: जेटलींचे राजकारणाव्यतीरीक्त क्रिकेटवर देखील प्रेम होते. गौतम गंभीरनं, विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. गंभीरनं ट्विटरवरून “वडिल आपल्याला बोलायला शिकवतात, मात्र आपल्या आयुष्यात जी व्यक्त पित्या समान असते ती तुम्हाला जीवनात कसे वागायचे हे शिकवते. वडिल तुम्हाला नाव देतात, तर पित्या समान व्यक्ती तुम्हाला ओळख देतात. आज मी माझ्या पित्या समान व्यक्तीला गमावले. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


तर  “अरुण जेटलींच्या निधनाच्या बातमीने खूप दू:ख झाले. जेटलींनी दिलेल्या संधींमुळेच दिल्लीतील क्रिकेटपटूंना देशाच नेतृत्व करणे शक्य झाले. जेव्हा दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष केले जात होते तेव्हा अरुण जेटलींनी दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दूर्लक्ष होण्याचे कारण ऐकून घेत अनेक क्रिकेटपटूंच्या समस्या सोडविल्या” असे सेहेवागने केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.