कोल्हापूर : भाजप शिवसेना युतीला कोल्हापूर जिल्ह्यातून अपवाद वगळता हद्दपार करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. या मागे राष्ट्रवादीचे जेष्ठनेते शरद पवार यांची व्यूव्ह रचना आणि प्रचार कारणीभूत आहे. पवार यांच्या कार्याची दखल घेत कार्यकर्त्यांनी “बाप बापचं असतो” अशी फलकबाजी करत युतीला आणि विशेषतः महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना डिवचले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत पवार यांनी झंझावात प्रचार करून राष्ट्रवादीला चांगलीच उभारी मिळवून दिली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात दाखल झालेल्या अनेक दिग्गजांना पवार यांच्या व्यूव्ह रचनेने परभावाची धूळ चारली आहे.
निवडणुकीच्या काळात शरद पवार यांच्यावर चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे वय झाले आहे, अशी टीका केली होती. त्याचा राग राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनात होता. या भावनांना त्यांनी या पोस्टरच्या माध्यमातून वाट करून दिली आहे.