पुणे – एका तरुणावर त्याच्या सासरा व मेव्हण्याकडून हल्ला करण्यात आला. तो विनाकारण गल्लीत फिरत कोणाच्याही घरी जात असल्याने हा हल्ला करण्यात आला. अल्ताफ मोहंमद शेख, मोहंमद शेख व जन्नत मोहंमद शेख( सर्व रा.पाटील इस्टेट ) यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादीच्या महिलेचा मुलगा अरबाज मुलाणी हा मोहंमद शेख यांचा जावई आहे. मोहंमद शेख याने त्यास तु गल्लीत का फिरतोस, कोणाच्याही घरात का घुसतोस असा जाब विचारला होता. यानंतर त्याला हाताने मारहाण करण्यात आली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी मुलांसह अरबाजच्या सासरी गेली होती.
यावेळी त्यांच्या अंगावर मोहंमद व अल्ताफ लोखंडी पाईप व लाकडी दांडके घेऊन धाऊन आले. यानंतर मेव्हणीने हाताने जबर मारहाण केली. तर सासरा मोहंमदने पुन्हा अरबाजला हाताने जोरात तोंडावर बुक्की मारली. यामध्ये त्याचे दोन दात पडले. तसेच फिर्यादीच्या दोन्ही मुलींना मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक साळवी करत आहेत.