नवी दिल्ली – ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचा 20 व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. उंचीवरून पडल्यामुळे रमेश अग्रवाल यांची अनेक हाडे तुटली होती. विशेष म्हणजे वडिलांचा मृत्यू झाल्याची आणि त्यांचा मृतदेह इमारतीखाली पडला असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना नव्हती.
पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांच्या शरीरातील जवळपास सर्व हाडे तुटलेली आहेत. या अपघातानंतर संपूर्ण सोसायटीमध्ये शोककळा पसरली होती. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने सोसायटीच्या गेटवरच माध्यमांची मोठी गर्दी झाली. त्यादृष्टीने गेटवरच बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पीडितेच्या कुटुंबानेही मीडिया आणि इतरांपासून स्वतःला दूर केले होते. अशा स्थितीत सोसायटीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.
कुटुंबियांना नव्हती अपघाताची माहिती
रमेश अग्रवाल 20 व्या मजल्यावरून खाली पडल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांनाच माहीत नव्हती. घटनेच्या वेळी रितेश तसेच कुटुंबातील इतर सदस्य फ्लॅटमध्ये उपस्थित होते. फ्लॅटच्या गॅलरीतून रमेश अग्रवाल खाली कोसळल्याचे सांगण्यात आले. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक व्यक्ती पाहिल्यानंतर त्यांनी इतरांना याबाबत माहिती दिली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना
यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताची माहिती घेतली व मृताची ओळख पटली. यानंतर नातेवाइकांनी त्यांना घेऊन तातडीने खासगी रुग्णालय गाठले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण उद्योग जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.