Pune News : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात पंधरा दिवसांपासून एका तरुणीचा अॅानलाईन छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार मेसेज, संपर्क करण्याचे प्रयत्न आणि त्रासदायक वर्तनामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती. Pune News अखेर तिने ही बाब आपल्या वडिलांना सांगितली. ही गोष्ट तरुणीच्या वडिलांना समजताच त्यांनी त्रास देणाऱ्या संबधित विद्यार्थ्याला चांगलाच चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नेमकं काय घडलं? (Pune News) पुण्यातील नामांकित MIT ADT विद्यापीठाच्या आवारात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. गेल्या १५ दिवसांपासून एका तरुणीचा ऑनलाईन छळ करणाऱ्या डी. वाय. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्याला तरुणीच्या वडिलांनी कॅम्पसमध्येच गाठले आणि जाब विचारला. यावरून दोन्हीकडून बाचाबाजी झाली आणि संतापलेल्या वडिलांनी विद्यार्थ्याला खडेबोल सुनावत चोप दिला. तरुणीच्या वडिलांनी विद्यार्थ्याला जाब विचारत मुलीला पुन्हा त्रास दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. ही घटना कॅालेजच्या कँम्पसमध्येच घडली असल्याने याची जोरदार चर्चा आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काहींनी कँम्पसमध्ये घडत असलेला हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रित केल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची पुण्यातील शैक्षणिक वर्तुळात चर्चा असून, अजूनपर्यंत अधिकृत तक्रार दाखल झाली की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेनंतर पालकांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. हेही वाचा : Share Market: भारतीय शेअर बाजारांमध्ये आज पुन्हा तेजी ; सेन्सेक्समध्ये ४१४ अंकांनी वाढ