रेल्वेच्या धडकेत पिता पुत्राचा मृत्यू; लोणंद रेल्वे स्टेशनजवळ घडली दुर्घटना

लोणंद – लोणंद रेल्वे स्टेशननजीक निरा बाजूला काल रविवारी दि. 26 रोजी सांयकाळी बंगळुरू- जोधपूर एक्‍सप्रेस रेल्वे गाडी नंबर 06506 या रेल्वेच्या धडकेमध्ये अंदोरी (ता. खंडाळा) येथील एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय 28) व त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा रुद्र बोडके या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला.

अंदोरी येथील शैलेश बोडके हे धुळे येथे एसआरपीएफमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. शैलेश बोडके सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वीच अंदोरी येथे घरी आले होते. शैलेश बोडके त्यांच्या रुद्र या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेले असता बंगळुरु- जोधपूर एक्‍सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये पिता – पुत्राचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. आर. पाटोळे, आदीनाथ भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.