लोणंद – लोणंद रेल्वेस्टेशननजीक नीरा बाजूला काल (दि. 26) सायंकाळी बंगळुरू-जोधपूर रेल्वे एक्सप्रेसच्या धडकेत अंदोरी, ता. खंडाळा येथील शैलेश ज्ञानेश्वर बोडके (वय 28) व त्यांचा एक वर्षाच्या मुलाचा रुद्र यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शैलेश बोडके हे राज्य राखीव पोलीस दलात धुळे येथे कार्यरत होते. त्यांची पत्नी मुंबई पोलीस दला कार्यरत आहे. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी अंदोरी येथे घरी आले होते. ते रुद्र या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सायंकाळी लोणंद रेल्वेस्टेशनवर गेले असता, बंगळुरू-जोधपूर एक्सप्रेसच्या धडकेत दोघांचा अंत झाला. रेल्वे पोलीस दलातील सपोनि व्ही. आर. पाटोळे, आदिनाथ भोसले व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.