नाशिक – नाशिक शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. वडीलांनी मुलाचा खून करून नंतर स्वत: राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना नाशिकमधील पंटपटी भागात घडली आहे. दरम्यान वडीलांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप कळू शकले नाही. या धक्कादायक घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वडील जगदीश जाधव व मुलगा प्रणव जाधव असे वडील व मुलाचे नाव आहे. वडिलांनी आधी सकाळी पंचवटी सीतागुंफासमोर मुलाचा खून केला त्यानंतर स्वत: त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.