कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर शहरामध्ये जन्मदात्या पित्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घडल्या प्रकारानंतर नराधम बापाला नागरीकांनी चांगलाच चोप दिला.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली. शनिवारी सकाळी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.
हा नराधम आरोपी शहरात पत्नी आणि दोन मुली, एक मुलगा यांच्या समवेत राहत असून, तो हमालीचे काम करतो आहे. शुक्रवारी त्याने राहत्या घरात स्वतःच्या पाच वर्षाच्या बालिकेवर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केला.
ही घटना बालिकेने आईला सांगितल्यानंतर या घडला प्रकार समोर आला. तसेच त्या प्रकाराची माहिती समजताच घटनास्थळी शेजारील नागरीकांनी धाव घेतली. त्या नराधम बापाला चांगलाच चोप देवून पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी पोलिसात पिडीत बालिकेच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळासह पोलीस ठाण्यास भेट दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.