पाकिस्तानने अतिरेक्‍यांविरुद्ध कारवाई केली नाही – एफएटीएफ

नवी दिल्ली- पाकिस्तानने अतिरेक्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचा नुसता देखावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात पाकिस्तानला अतिरेक्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात अपयश आले आहे, असे मत एफएटीएफने (आर्थिक कारवाई कार्यदल) व्यक्त केले आहे. एफएटीएफकडून टार्गेट देण्यात आलेले 27 पैकी 25 टार्गेट पूर्ण करण्यात पाकला अपयश आले आहे.

अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनच्या अर्थपुरवठ्यावर अंकुश आणण्यासाठी पाकिस्तानला कारवाई करायची होती, पण यातील बहुतांश प्रकरणात कारवाई झालीच नाही.

यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बॅंक आणि युरोपीय संघाकडून पाकिस्तानची आर्थिक पत खालच्या श्रेणीत टाकली जाऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती आणखी खराब होऊ शकते.

त्यातच पाकिस्तानने अतिरेकी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद व सहयोगी संघटना जमात-उद-दावा व फलाह-ए-इन्सानियतच्या शाळा, मदरसे, क्‍लिनिक चालविण्यासाठी 70 लाख डॉलरचे जे वाटप झाले, त्याची चौकशी सुरू केली आहे काय? याची माहिती एफएटीएफने मागितली आहे. त्यामुळे पाकिस्तान आता चांगलाच आर्थिक संकटात सापडण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.