‘फत्तेशिकस्त’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे: मराठेशाहीचा इतिहास हा जसा संस्कृती,परंपरांचा,अभिमानाचा आहे तसाच तो शूरांचा, शौर्याचा आणि त्यांच्या बेधडक साहसाचा सुद्धा आहे. हा इतिहास दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित  ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून दिसणार आहे. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना हाणून पाडत. शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहीतील सर्जिकल स्ट्राइकच! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’’ मधून अनुभवता येणार आहे.

अफझलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण शाहिस्तेखानाचे संकट उभे राहिले. शाहिस्तेखानाच्या  धुमाकूळात स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. महाराजांनी आपल्या विश्वासू मंडळींबरोबर विचारविनिमय करून योजना पक्की केली. रामनवमीच्या आदल्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध अष्टमीला लालमहालावर हल्ला करण्याचे निश्चित ठरले. यासाठी शिवरायांनी शॉक ट्रीटमेंटचा वापर करायचा विचार केला आणि त्याबरहुकुम योजना बनवली. १ लाख मुघल सैन्याविरोधात आपले ९० विश्वासू शिलेदार घेवून महराजांनी जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट लष्करी कारवाई फत्ते केली त्याचा रोमांचकारी अनुभव ‘फत्तेशिकस्त चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारी यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची भट्टी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे. तसेच कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत आणि अजय आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)