पुणे – पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व रांका ज्वेलर्स समुहाचे मालक फतेचंद रांका यांना ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमॅस्टिक कौन्सिल तर्फे ‘जेम ऑफ दि ईयर’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या संस्थेमध्ये भारतातील 6 लाख ज्वेलर्समधून सामाजिक, व्यवसायिक, सार्वजनिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यावसायिकांना हा पुरस्कार देण्यात येतो.
दि. 20 ऑक्टोंबर 2021 रोजी ताज कन्व्हेक्शन सेंटर , गोवा येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध सिनेतारीका संगीता बिजलानी यांच्या शुभहस्ते फतेचंद रांका यांनी ‘जेम ऑफ दि ईयर’ हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आशिष पेठे, उपाध्यक्ष संयम मेहरा, निलेश सोभावत तसेच रांका ज्वेलर्सचे वस्तुपाल रांका व श्लोक रांका यांच्यासह अनेेक प्रतिष्ठित उपस्थित होते. ऑल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमॅस्टिक कौंन्सिल ही भारतामधील सर्वात मोठी ज्वेलरी इंडस्ट्रीची शिखर संस्था आहे. या कार्यक्रमात भारतामधील सर्व राज्यातील सराफ व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.