Nigeria Accident | पश्चिम आफ्रिकन देश नायजेरियामध्ये एका तेलाच्या टँकरची ट्रकला धडक बसल्याने मोठा स्फोट झाला. या अपघातात 48 लोकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 50 गुरे जिवंत जळली आहेत.
नायजरचे पोलीस महासंचालक अब्दुल्लाही बाबा-अरब यांच्या म्हणण्यानुसार, ट्रक नायजरच्या अगाई येथे गुरे घेऊन जात असताना एका तेलाच्या टँकरला धडकला आणि स्फोट झाला. यात सुमारे 50 गुरे जिवंत जळाली तर 48 लोकांचा मृत्यू झाला. अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातानंतर लोकांमध्ये संताप निर्माण झाला. त्यापार्श्वभूमीवर राज्याचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. Nigeria Accident |
Officials say a fuel tanker collided with a truck in Nigeria causing an explosion that killed at least 48 people, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2024
दरम्यान, नायजेरियामध्ये सामानाची वाहतूक करण्यासाठी सक्षम रेल्वे यंत्रणा नाही, त्यामुळे आफ्रिकेच्या सर्वाधिक लोकसंख्याच्या देशात जीवघेणे ट्रक अपघात होतात. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, 2020 मध्ये पेट्रोल टँकरचे 1531 अपघात झाले, ज्यामध्ये 535 लोकांचा मृत्यू झाला आणि 1142 लोक जखमी झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा झालेल्या या अपघातात 48 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. Nigeria Accident |
हेही वाचा:
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 9 नावांचा समावेश