Chinmoy Krishna Das | इस्कॉनचे माजी नेते चिन्मय दास यांच्या अटकेनंतर, मंगळवारी भारताने त्यांच्या अटकेबद्दल आणि जामीन नाकारल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच बांगलादेश प्रशासनाला हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याची विनंती केली. यादरम्यान आता चिन्मय कृष्णा दास यांच्या वकिलावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्कॉनचे कोलकातातील प्रवक्ते राधारमण दास यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
रामेन रॉय असे चिन्मय कृष्ण दास यांच्या वकिलाचे नाव आहे. त्यांच्यावर घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती गंभीर आहे. राधारमण दास यांनी सांगितले की, रॉय यांची एकच चूक होती की त्यांनी चिन्मय प्रभू यांना कायदेशीर संरक्षण दिले. इस्लामिक कट्टरतावाद्यांनी रॉय यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला.
या हल्ल्यात रॉय गंभीर जखमी झाले असून त्यांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. यासोबतच त्यांनी आयसीयूमध्ये दाखल असलेल्या वकिलाचा फोटोही पोस्ट केला आहे.
Please pray for Advocate Ramen Roy. His only ‘fault’ was defending Chinmoy Krishna Prabhu in court.
Islamists ransacked his home and brutally attacked him, leaving him in the ICU, fighting for his life.#SaveBangladeshiHindus #FreeChinmoyKrishnaPrabhu pic.twitter.com/uudpC10bpN
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) December 2, 2024
१६ सदस्यांची बँक खाती गोठवली
दरम्यान, बांगलादेशमध्ये सध्या हिंदू मंदिरांवर होत असलेल्या कारवाया काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. कारण आता बांगलादेशच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी इस्कॉनशी संबंधित एका हिंदू नेत्याची आणि इस्कॉनशी संबंधित १६ सदस्यांची बँक खाती ३० दिवसांसाठी गोठवण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
इस्कॉनच्या १६ सदस्यांमध्ये माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांच्या नावाचाही समावेश आहे, ज्यांना या आठवड्यात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. बांगलादेशाच्या ध्वजापेक्षा वर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. चिन्मय दास यांना अटक केल्यानंतर बांगलादेशात हिंसक घटना सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा:
डोनाल्ड ट्रम्प यांची हमासला थेट धमकी ; म्हणाले,”ओलिसांची सुटका करा नाही तर…”