लातूर : लातूरमधून अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ कार आणि टेम्पो यांच्यात हा भीषण अपघात झाला. तसेच या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
उदगीर तालुक्यातील एकुरकाजवळ आज गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मारुती स्विफ्ट डिझायर कारने या महिला उदगीरहून एकुरगाकडे जात होत्या. एकुरगा गावाजवळ पोहोचले असताना भरधाव आयशर टेम्पोला त्यांची कार धडकली. ही धडक एवढी भीषण होती कि या अपघातात गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे तर कारमधील महिलांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मंगलबाई गोविंद जाधव (वय ५५ वर्ष राहणार एकुरका) प्रतिभा संजय भंडे (वय ३० राहणार दावणगावं), प्रणिता पांडुरंग बिरादार (वय २५ राहणार होणाळी) अन्यना रणजित भंडे (वय १४ वर्षस राहणार दावणगावं) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी झालेल्या तिघांवर उपचार सुरु आहेत. एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.