कर्जत -राशीनमध्ये होत असलेली अवैध गोमांस विक्री आणि कत्तल बंद करावी, या मागणीसाठी कमलेश साळवे या युवकाने सोमवारपासून (दि.10) राशीन पोलीस दुरक्षेत्रासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
साळवे यांनी पोलीस, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक यांना यासंदर्भात निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले आहे, राशीनमध्ये बेकायदेशीर गोमांस विक्री तसेच मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल केली जात आहे. कोणताही शासकीय परवाना नसताना ही कत्तल केली जात आहे.
यापूर्वी 6 फेब्रुवारीला बेकायदेशीर कत्तलीबाबत तक्रार अर्ज केला होता. मात्र या अर्जाची दखल न घेतल्याने व त्यांच्यावर कारवाई न केल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.