बुद्धिबळ स्पर्धेत संघर्ष करपे विजेता

पुणे – संघर्ष करपे याने सहा गुणांसह जलद बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात विजेतेपद पटकाविले. त्याने अप्रतिम डावपेचांचा उपयोग करीत या स्पर्धेत वर्चस्व गाजविले. ही स्पर्धा व्हिक्‍टोरियस अकादमीतर्फे आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धेतील उपविजेतेपदासाठी चुरस दिसून आली. मेहेर खेडकर व हर्ष सातव यांचे प्रत्येकी पाच गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक देण्यात आला. सुधीर रांगे, प्रध्येश देशपांडे, मुग्धा खोपकर, हातिम मास्टर यांना अनुक्रमे 4 ते 7 क्रमांक देण्यात आले. नारायणी टिळेकरने आठवे स्थान घेतले.

स्पर्धेतील 10 वर्षाखालील विभागात मानस रांगे, विहान हेगडे व तनया तेंडुलकर हे अनुक्रमे पहिले तीन क्रमांकाचे मानकरी ठरले. आठ वर्षाखालील विभागात ओजस पाटील, अर्जुन चांदसकर व गार्गी कुलकर्णी यांना पहिली तीन बक्षीसे देण्यात आली. अविरत चौहान, ओम रामगुडे व वेदांत काळे यांनी पहिले तीन क्रमांक घेतले. सई चौबळ हिची सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड झाली. पारितोषिक वितरण समारंभ क्रीडा संघटक उल्हास व वैशाली टिळेकर यांच्या हस्ते झाला. यावेळी मीनल सोमय्या, शिल्पा शेजपाळ, समीर घेला उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)