पुणे – विश्वविजय अकादमीतर्फे डॉल्फिन इंटरनॅशनल स्कूलच्या सहकार्याने रविवारी जलद बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होणार आहे.
या स्पर्धेस डॉल्फिन इंटरनॅशनल स्कूल (जुनी सांगवी) येथे सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा खुला, 8, 10, 12 व 14 वर्षाखालील या गटात होणार आहे. खुल्या गटाकरिता 2 हजार, 1500, 1 हजार रुपये अशी पहिली तीन बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. त्याखेरीज ज्येष्ठ खेळाडू, सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू अशी पारितोषिकेही दिली जाणार आहेत.