तिरूवनंतपूरम – आयपीएलमधील झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात लावण्यात आलेली बंदी मागे घेतली गेल्यामुळे वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेसाठी केरळ राज्य संघटनेने त्याचा संभाव्य खेळाडूंच्या संघात समावेश केला आहे.
बंदी मागे घेतली गेल्यानंतर श्रीशांतने लॉकडाऊनच्या काळात नेटमध्ये जोरदार सराव केला होता. त्याचबरोबर फिटनेसवर देखील लक्ष दिले होते. श्रीशांत येत्या 20 डिसेंबरपासून केरळ संघाबरोबर सराव करणार आहे.सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगप्रकरणी 36 वर्षीय श्रीशांतवर 2013 साली बंदी घालण्यात आली होती.त्याच्यासह राजस्थान रॉयल्सचा सहकारी खेळाडू अजित चंडिला व अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घातली गेली होती. जैन यांच्या समितीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही बंदी सात वर्षांवर आणण्यात आली असल्यामुळे त्याला आता पुन्हा क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली.
आयपीएलमधील एका सामन्यात एका षटकात 14 धावा देण्यासाठी श्रीशांतला 10 लाख देण्यात आल्याचा व त्याने हे पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयने बंदी लावली होती.