सिडनी – टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने कौटुंबिक कारणाने उर्वरित सामन्यांतून माघार घेतली आहे. कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्यामुळे स्टार्कने उर्वरित टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे.
कॅनबेरा येथून सिडनीला पोहोचल्यानंतर स्टार्क बायोबबलमधून बाहेर निघाला. स्टार्कने टी-20 मालिकेतून माघार घेतल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचा बदली खेळाडू घेतलेला नाही. त्यामुळे स्टार्कच्या अनुपस्थितीत अँड्य्रू टाय किंवा डॅनिअल सॅम्स यांना संघात संधी मिळेल. खेळाडूंच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे.