वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची क्रिकेटमधून निवृत्ती

कोलंबो – श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने टी -20 क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्याने स्वतःच्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली. आगामी टी -20 विश्वकरंडक स्पर्धा काही आठवड्यांवर आलेली आहे. अश्यातच निवृत्ती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 यापूर्वी त्याने कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मलिंगा आपल्या विचित्र गोलंदाज ॲक्शन व आगळ्यावेगळ्या हेअर स्टाईलसाठी प्रसिद्ध होता . त्याने सततच्या दुखापतीमुळे एकदिवसीय क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले योगदान दिले. 2014 मध्ये श्रीलंकेने बांगलादेशातील झालेला टी -20 विश्वकरंडक आपल्या नावे केला होता. या विश्वकरंडकात तो संघाचा कर्णधार राहिलेला.

सोशल मीडियावरुन केली घोषणा
नुकतंच लसिथने ट्विट करत निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, ‘मी माझे टी-20 चे शूज कायमसाठी थांबवतोय. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून मी निवृत्ती घेत आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला साथ दिलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. मी येणाऱ्या काळात युवा क्रिकेटपटूंसोबत माझे अनुभव शेअर करण्यासाठी उत्सुक आहे.’

 

कारकीर्द
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हॅट्रिक
तीन वेळा वनडे तर दोन वेळा टी 20
सलग चार चेंडूवर चार बळी घेण्याची कामगिरी दोन वेळा
30 कसोटी सामन्यात 101 विकेट
226 एकदिवसीय सामन्यात 338 विकेट
84 टी 20 सामन्यात 107 विकेट

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.