फोरोची अनोखी स्वप्ने आणि निराशावादी पूर्वग्रह! (भाग-1)

प्राचीन इजिप्तमध्ये फारोला म्हणजे तेथील राजास दोन अनोखी स्वप्ने पडली होती. पहिल्यांदा, त्याला सात सुंदर व धष्टपुष्ट गायींचं स्वप्न पडलं, ज्यामध्ये सात कुरूप व दुबळ्या गायींनी त्या सात धष्टपुष्ट गायींना खाऊन टाकलं. तर दुसऱ्या स्वप्नात त्यानं एकाच ताटाला ७ भरदार कणसं आलेली पाहिली आणि त्यानंतर निघालेल्या खुरटलेल्या व करपलेल्या सात कणसांनी ती भरदार सात कणसं गिळून टाकिली. तेंव्हा या स्वप्नांचा अर्थ व हेतू काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला उत्सुकता निर्माण झाली व त्यानं त्यासाठी ज्ञानी योसेफास बोलावलं. योसेफानं त्याला समजावलं – दोन्ही स्वप्नांचा अर्थ सारखाच होता.

इजिप्तमध्ये सात वर्षांची भरभराट होईल त्यानंतर सात वर्षं दुष्काळ पडेल. त्याने फारोला सुचवले,  “सात चांगल्या वर्षांत एखाद्या चतुर व्यक्तीस देशावर नेमून त्यानं सुकाळाच्या ७ वर्षांत सर्व देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा तसेच सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करून साठवण्याची जबाबदारी द्यावी. म्हणजे दुष्काळाच्या सात वर्षांत ही साठवणूक बेगमी होईल व दुष्काळानं देशाचा नाश होणार नाही.”. या प्रस्तावामुळे प्रभावित होऊन फारोनं योसेफालाच अख्ख्या मिसर देशावर नेमलं. बायबलमधील ही कहाणी जीवनातील चक्राचा संदर्भ देते – चांगल्या काळानंतर वाईट काळ येतो आणि, उलट.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फोरोची अनोखी स्वप्ने आणि निराशावादी पूर्वग्रह! (भाग-2)

गुंतवणूकीच्या जगात हे ‘प्रचलित ट्रेंडबद्दल अभिग्रह’ या संकल्पनेशी जोडली जाऊ शकतात.अलीकडच्या काळातील घडामोडींमुळं अलीकडील प्रचलीत ट्रेंड आणि गुंतवणूकीमधून मिळणारा परतावा पाहता आम्ही असं गृहित धरू लागतो की हे असेच ट्रेंड भविष्यातही कायम राहतील. विचार करण्याच्या या पद्धतीस रिसेन्सी बायस म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण ज्या रांगेत थांबलो आहोत त्याखेरीज इतर रांग जर थोडीशी वेगानं सरकू लागली तर ९०% लोक आपली रांग सोडून त्या दुसऱ्या रांगेत जाऊन थांबतात व मग त्यांना असं आढळून येतं की आता आधीचीच रांग अधिक त्वरेनं सरकतीय आणि मग ते पुन्हा आधीच्याच रांगेत सर्वांत शेवटी येऊन थांबतात परंतु तोपर्यंत त्यांची आधीची जागा कधीच पुढं गेलेली असते. बाजारातील किंवा अर्थव्यवस्थेतील अशा घटनाचक्रांविषयी जागरूकता बाळगून व अशा परिस्थितीमध्ये आपले गुंतवणूक पोर्टफोलिओ पुनर्रसंतुलित करून असे पूर्वग्रह टाळता येण्यासाठी मदत होऊ शकते व अशानं आपण एक उत्तम गुंतवणूकदार देखील बनू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)