नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी संसदेत जम्मू-काश्मीर बाबत मोठा निर्णय घेत जम्मू-काश्मीरमधील कलम 370 काढून राज्याला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या निर्णयाबाबत खासदार फारुक अब्दुल्ला यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
कलम 370 रद्द करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी आहे. आम्ही याविरोधात दगडफेक करणार नाही. आम्ही या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ. केंद्र सरकार आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत असुन सध्या माझा मुलगा तुरुंगात आहे, असे जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार फारुक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.