उन्हाळ्यातील पाणीटंचाई टळली : नागरिक समाधानी
पेठ – थूगाव (ता. आंबेगाव) येथील गावाला व वाड्या-वस्त्यांना सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या सामाजिक वनीकरणमधील शेततळे पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात या गावाला पाणीटंचाई भासणार नाही.
थूगाव येथील सामाजिक वनीकरण मधील सार्वजनिक शेततळे मंचर येथील मोरडे फूड प्रॉडक्ट व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने बांधून मागील वर्षांपासून तयार करण्यात आले आहे. ते शेततळे पूर्ण भरले आहे. त्यामुळे सातगाव पठार भागातील एकमेव थूगाव गावाला भर उन्हाळ्यात स्वतःची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना असल्याने नळाद्वारे संपूर्ण गावाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून घेतली आहे.
थूगावमध्ये घरोघरी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी अगदी भर उन्हाळ्यात दिले जाते. महिलांना सक्षमीकरण करून या महिलांच्या डोक्यावरून हंडा उतरवण्यासाठी या गावाने या तळ्याचे काम करण्यासाठी मंचर येथील मोरडे फूड प्रॉडक्टच्या आर्थिक योगदान व ग्रामस्थ यांचा पुढाकार आहे.