आणखी एका आंदोलक शेतकऱ्याची चिठ्ठी लिहून आत्महत्या; फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नवी दिल्ली – टिकरी सीमेपासून सात किमी अंतरावर झाडाला गळफास घेत एका 49 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली. हा शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.

मुळचा हिसार जिल्ह्यातील असणारा शेतकरी झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला असे बहादूरगढ शहर पोलिस ठाण्याचे अंलदार विजय कुमार यांनी सांगितले. त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना कळवली. त्याच्याकडे आत्महत्या करण्यापुर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली आहे.

टिकरी सीमेवरील आंदोलनस्थळापासून दोन किमी अंतरावर या आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या अन्य एका शेतकऱ्याने गेल्या महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. तर हरियाणातील एका शेतकऱ्याने या कायद्यांच्या विरोधात किटकनाशक प्यायले होते. त्याचा दिल्लीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्यात या आंदोलनाला पाठींबा देत एका वकीलाने किटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. तत्पुर्वी शिख धर्मगुरू संत रामसिंग यांनी आपण शेतकऱ्यांचे हाल पाहू शकत शकत नसल्याचे सांगत आपले जीवन संपवले होते.

गेल्यावर्षी नोव्हेंबर पासून केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत म्हणून दिल्लीच्या सीमांवर शेकडो शेतकरी आंदोलन करत आहेत. बड्या भांडवलदारांच्या सोयीसाठी किमान आधारभूत किंमत रद्द व्हावी म्हणून हा आखलेला कट असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तर या कायद्याने शेतीत नवे तंत्रज्ञान आणले जाईल, असा केंद्र सरकारचा दावा आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांमुळे हे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे रजबीर यांनी लिहले आहे. हे तीन कायदे मागे घेऊन केंद्राने आपली अंतिम इच्छा पूर्ण करावी, असे त्यात नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.